धक्कादायक घटना निवासी शाळेत नववीच्या विद्यार्थिनीने शाळेच्या शौचालयात दिला बाळाला जन्म

0
धक्कादायक घटना 
निवासी शाळेत नववीच्या विद्यार्थिनीने शाळेच्या शौचालयात दिला बाळाला जन्म 



कर्नाटक:-

कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यातील सरकारी निवासी शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने शाळेच्या शौचालयात बाळाला जन्म दिला. या घटनेनंतर शाळा प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोक्सो कायद्यानुसार मुख्याध्यापक, वॉर्डन आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा उलगडा
२८ ऑगस्ट रोजी पहाटे २.३० च्या सुमारास नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला अचानक प्रसूती वेदना सुरु झाल्या. शाळेच्या वसतिगृहातच ती शौचालयात गेली आणि तिथेच तिने मुलाला जन्म दिला. घटनेची माहिती समजताच शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यात मोठी खळबळ उडाली.


अल्पवयीन आई व नवजात बाळ सुरक्षित

जन्मानंतर विद्यार्थिनी व तिच्या नवजात बाळाला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दोघेही सुरक्षित असल्याचे सांगितले असून त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू आहेत.


बाल हक्क आयोगाची तत्काळ दखल

कर्नाटक राज्य बाल हक्क आयोगाचे सदस्य कोसुंबे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांना गुन्हा नोंदवण्याचे आणि तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी हर्षल भोयर , पोलीस अधीक्षक व सिईओ रुग्णालयात दाखल झाले बाळाची व आईची योग्य ती काळजी घ्यावी आणि उत्तमोत्तम उपचार करण्याच्या सुचना देण्यात आले 
पोलीसांनी आरोपीची ओळख २८ वर्षीय पुरुष अशी ओळख केली आहे 
जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या तक्रारी वरुन पोलीसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे महत्वाचे म्हणजे अल्पवयीन मुलगी शाळेत गर्भधारणा होऊन नव महीणे लोटले तरी निवाशी शाळेच्या मुख्याध्यापक व ईतर कर्मचाऱ्यांना कसे समजले नाही हे विशेष

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !