माजी मंत्री आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या कडून शालेय विद्यार्थ्यी व पालकांना छत्र्यांचे वाटप

0

माजी मंत्री आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या कडून शालेय विद्यार्थ्यी व पालकांना छत्र्यांचे वाटप 


सावित्रीबाई फुले शाळा आष्टी येथे करण्यात आले वितरित 

आष्टी:-
अहेरी विधानसभा मतदार क्षेत्राचे लोकप्रिय व जनकल्याण लोकनेते माजी कॅबिनेट मंत्री आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या कडून राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष तथा लोककल्याण फाऊंडेशन आष्टी अध्यक्ष राहुलजी डांगे यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले शाळा आष्टी येथे विद्यार्थी व पालकांना दि.०१/०८/२०२५ ला पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्र्यांचे वाटप करण्यात आले 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष तथा लोककल्याण फाऊंडेशन आष्टी अध्यक्ष राहुलजी डांगे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सौ.ममताताई डांगे, सौ.राखीताई मडावी,सौ.सरोजा बोंडे, मुख्याध्यापीका सुनंदा गलबले, पदवीधर शिक्षक महेंद्र खोब्रागडे,चंद्रवैभव आत्राम, नितीन शेडमाके आदि मान्यवर उपस्थित होते 


 कार्यक्रमाची सुरुवात राहुलजी डांगे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे द्विप प्रज्वलित करुन, पुष्पहार अर्पण करण्यात आले 
 आणि विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे गावातील समाजबांधव व पालकांना ही छत्र्यांचे वाटप करण्यात आले. 
  कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, राहुलजी डांगे यांनी आपल्या भाषणातील अध्यक्षीय पुष्प गुंफताना, आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. 
  सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदवीधर शिक्षक महेंद्र खोब्रागडे,संचालन सहाय्यक शिक्षक आय.एम.शेरेकर तर आभार सहा. शिक्षक पी. टी. वाकडे यांनी केले. 
 संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील स.शी. बि. ए. क्षिरसागर स. शि. टी. एम. मल्लेलवार स. शि. के. आर. मसराम या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच शाळेतील समस्त विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !