साखरा येथील सरपंच पुण्यवान सोरते ग्रामरत्न पुरस्काराने सन्मानित

0

साखरा येथील सरपंच पुण्यवान सोरते ग्रामरत्न पुरस्काराने सन्मानित 



गडचिरोली:-
जिल्हा मुख्यालयापासुन जवळच असलेल्या साखरा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच पुण्यवान सोरते यांना ग्रामरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे 
पंचायतराज विकास मंच, अखिल भारतीय सरपंच परिषद यांचे द्वारे हा पुरस्कार पुणे जवळ लोणावळा येथे इतिहासकार कोकाटे, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व झाडाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला आहे 
साखरा येथील सरपंच पुण्यवान सोरते यांना ग्रामरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल भाकरोंडीचे सरपंच विलास उसेंडी, विलास बावणे, तुषार मडावी, शिवाजी गावळे, भावणा मिस्त्री, रत्नमाला शेलोटे,ज्योती कासरे, पिंगला हलामी,कांता हलामी, प्रदीप कुमरे अविनाश कन्नाके, सतीश गुरनुले, प्रियंका कुमरे,राजेश लिंगायत,लोमेश सहारे, ज्ञानेश्वर धारणे,चेतन पेंदाम इत्यादी सरपंचासह सरपंच संघटने कडून अभिनंदन करण्यात आले आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !