पोतेपल्ली (रै)(रेगडी) येथील कोंबडा बाजारावर पोलीसांची धाड, २२४१०० रुपयाचा मुद्देमाल जप्त

0
पोतेपल्ली (रै)(रेगडी) येथील कोंबडा बाजारावर पोलीसांची धाड,
२२४१०० रुपयाचा मुद्देमाल जप्त 



गडचिरोली:- पोतेपली (रै) रेगडी येथील कोंबडा बाजारावर पोलीसांची धाड टाकून २२४१०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे 
जिल्ह्यातील दुर्गम भागात कोंबडा बाजार भरवील्या जातो व कोंबड्यांची झुंज लाऊन जुगार खेळल्या जात असल्याची माहिती वरुन त्यावर अंकुश घालावे व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक निलोत्पल गडचिरोली यांनी जिल्ह्यातील सर्व पोस्टे, उपपोस्टे ,व पोमके येथील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत 
यावरून काल दि. २७ जुलै २०२५ ला पोलीस स्टेशन रेगडी हद्दीतील पोतेपल्ली (रै)  येथे पोलीसांनी धाड टाकली असता बरेचशे लोक जंगलाचा आधार घेऊन पळून गेले मात्र  सहा जुगारी हाती लागले  यामध्ये दोन लाख चोवीस हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे 
सदर कारवाई दरम्यान पांडुरंग चिन्ना तीम्मा वय  ५७ , रुषी महारु तिम्मा वय ६०, महेंद्र हिरामण कुलेटी वय २७, विजय रामजी कुलेटी वय ५० सर्व रा. पोतेपल्ली (रै),करण कार्तीक बिस्वास वय ३४ रा सिमुलतला,शामल मथुरा अहिरवार वय ३५ रा.महाकाली वार्ड चंद्रपूर  यांच्या कडील चार दुचाकी वाहण किंमत  दोन लाख दहा हजार रुपये, रोख रक्कम ११७७०, तीन कोंबडे २१८०,  तीन लोखंडी कात्या १५० रुपये असा एकूण २२४१०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यावरुन रेगडी पोलीस स्टेशन येथे अपराध क्र.१८ / २०२५ कलम १२(बं) महा.जुगार अधिनियम  नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार मधुकर सुर्यवंशी करीत आहेत 
सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल गडचिरोली,अप्पर पोलीस अधीक्षक एम.रमेश ,गोकुळ राज, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली  रेगडीचे प्रभारी अधिकारी कुनाल इंगळे,पोअं मालू पुंगाटी,सचीन निमगडे,शिवा आडे, जितेंद्र बोलीवार, गुलशन आत्राम, संदीप खेडकर, सुनील गेडाम,आषीश सोनमनवार, सुनील मडावी, विवेक घोडीचोर आदींनी पार पाडली

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !