चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलोरो पलटी होऊनही नशीब बलवत्तर म्हणून वाचले प्राण
वैनगंगा वार्ता/ तालुका प्रतिनिधी श्रीकृष्ण गावडे
एटापल्ली;-
दि. रविवारला रात्री एटापल्ली नाक्याजवळ एका दुकानासमोर बोलेरो नेवो क्र.MH33 AC 7730 या वाहणाने चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला मात्र नशीब बलवत्तर म्हणून वाहनातील सर्वजण बचाल्याची घटना काल रात्री घडली काही क्षणांसाठी घटनास्थळी मृत्यूचं तांडव निर्माण झाला आहे असे वाटले
अपघातावेळी सदर वाहणात खासगी कंपनीचे कर्मचारी प्रवास करीत होते. गाडीचा पुढचा भाग अक्षरशः चुराडा झाला होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचा वेग खुपच जास्त होता आणि चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बोलेरो उलटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मोठा आवाज ऐकताच परिसरातील लोक तातडीने घटनास्थळी पोहोचले. काहींनी मदतीचा हात पुढे करत जखमींना गाडीतून बाहेर काढले. काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती, मात्र लोकांच्या मदतीने रस्ता लवकरच मोकळा करण्यात आला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

