घरासमोरच ट्रक पलटल्याने मोठ्या आवाजाने हादरला परिसर, सुदैवाने टळली जीवितहानी
वैनगंगा वार्ता /तालुका प्रतिनिधी श्रीकृष्ण गावडे
एटापल्ली :-
घरासमोर ट्रक पलटी झाल्याने मोठा असा आवाज झाला की परिसर दणाणून गेला मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही दि २८ जूलै ला सकाळी साडेआठच्या सुमारास मरपल्ली रोडवर भरधाव वेगात असलेला ट्रक क्र .MH 33 T 3611 अचानक पलटी झाला आणि क्षणभरातच रस्ता अडवला गेला. ही घटना निजाम पेंदाम आणि मनोज मुजुमदार यांच्या मरपल्ली रस्त्यावरील घरासमोर घडला
अपघात इतका जोरदार होता की क्षणभर असं वाटलं, मोठी दुर्घटना घडली असावी. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतीचा हात पुढे केला, आणि काही वाहनांची रेलचेल नियंत्रित करीत रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला.वाहतूक कोंडी एवढी प्रचंड होती की काही वेळेस रस्ता अक्षरशः ठप्प झाला होता. हे असे अतिवेगवान वाहण सुरजागड येथील लोहखनिज वाहतूक करणारे असल्याने त्यावर अंकुश घालावे अशी मागणी परिसरातील जनतेनी केली आहे

