डॉ.तारकेश्वर उईके यांच्या वर तीन वर्षांनंतर पोलीसांनी केला गुन्हा दाखल
चिमुकल्या बालकाला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता
गडचिरोली:-
गडचिरोली येथील महीला व बाल रुग्णालयात चिमुकल्या बालकावर वेळीच उपचार न करता मुद्दाम दुर्लक्ष केल्यामुळे एका डॉक्टरला विभागीय चौकशी अंती दोषी ठरविण्यात आले त्यामुळे ती वर्षांनंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे
दि.१३ जुलै २०२२ चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पार्थ प्रधाने नावाच्या दोन वर्षांच्या चिमुकल्यास ताप आला म्हणून रात्री ११ वाजता गडचिरोली येथील महीला व बाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पार्थला दाखल करतेवेळी रात्र पाळीला डॉ.तारकेश्वर उईके हे कर्तव्यावर होते पार्थचे प्राथमिक उपचार सुरू झाल्यानंतर अचानक पहाटे ३ वाजता पार्थची प्रकृर्ती गंभीर दिसून आले तेंव्हा परिचारिकेने डॉ.उईके यांना फोन केला असता मोबाईल बंद करून ते झोपी गेले होते जवळपास तीन तास उपचार न झाल्याने ते बाळ मरण पावले
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच राजकीय हस्तक्षेप झाले होते त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल रुडे यांनी चौकशी समिती नेमली व डॉ.तारकेश्वर उईके यांची तडकाफडकी बदली केली होती त्या घटनेची तीन वर्षांत झालेल्या चौकशीत पदार्थांच्या उपचारात निष्काळजीपणा केल्याचे दिसून आले चौकशी समितीने आपला अहवाल वरिष्ठांना सादर केल्यानंतर उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर यांनी १८ जुलै २०२५ ला आपल्या अहवालात १३ जुलै २०२२ ला पार्थ प्रधाने याचा मृत्यू डॉ.उईके यांनी मुद्दाम दुर्लक्ष केल्यामुळे झालेला आहे असे नमुद केले आहे
सदर अहवालाची प्रत प्रधाने कुटुंबाला मिळताच चंदू प्रधाने यांनी २४/०७/२०२५ ला गडचिरोली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली
डॉ.तारकेश्वर उईके यांच्या वर पदार्थांच्या उपचारात निष्काळजीपणा दाखविल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे आरोप निश्चित झाल्याने भारतीय न्याय सहीता कलम ३०४ A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

