"मी आणि सर्व पक्ष कार्यकर्त्यांच्या खंभीरपणे पाठीशी ":- माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम

0

"मी आणि सर्व पक्ष कार्यकर्त्यांच्या खंभीरपणे पाठीशी ":- माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम 


 अहेरी येथे विविध गावातील सरपंच उपसरपंच, सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अ. प.) प्रवेश

वैनगंगा वार्ता /ता.श्रीकृष्ण गावडे
अहेरी:-
 आज दिनांक 27 जुलैला अहेरी येथे विविध गावातील ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच, सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अ. प.) प्रवेश झाला. गडचिरोली जिल्ह्याचे कुशल नेतृत्व राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत व राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष सिनेट सदस्य तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढाकाराने जामगिरी,वालसरा, कर्कापल्ली, विष्णुपुर, आमगाव, अशा विविध गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. यावेळेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपण सर्वांच्या सुखदुःखात नेहमी सोबत असून आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली. सर्व कार्यकर्त्यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा टाकून त्यांचे पक्षात त्यांनी स्वागत केले पक्षप्रवेशाच्या सोहळ्याला रवींद्रबाबा आत्राम, साईबाबा आत्राम, जे . डी . सेडमेक , सिनेट सदस्य तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम,हर्षवर्धनराव आत्राम , नागेश मडावी , पुष्पाताई अलोने, सारिकाताई गडपल्लीवार पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जामगीरी येथील प्रशांत गेडाम ,रेखा कोवे, पूनम कोवे, गुलाब उराडे ,बाबूराव गोरडवार, गुरुदास गेडाम ,प्रभाकर फुलझेले 
 वालसरा येथील नरेश धोटे, लोमेश सातपुते ,गणेश भांडारकर, कर्कपल्ली येथील अनिल जुरे ,सैनु जुरे, दिगंबर जनबंधू, भाऊजी जेवरे ,प्रवीण गायकवाड,सुरेश डोरलीकर,सुधाकर झुरे ,वसंत चीजघरे,रवींद्र कोसनकर, विष्णुपुरीतील तारापंत बरागी,माखन हलदर,अनुसुया विश्वास तर आमगाव येथील अमोल आनंदराव रामगुणवार, नाजूक वाडके ,झुंगाजी गुरुनुले,गुरुदास राऊत, करण नैताम, करण गद्दीवार,दुग सिंग सेंगर, खोजेंद्र करडे, संगम भंडारे आदींनी पक्ष प्रवेश केला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !