कंबालपेठा - मदाराम रोड देतो आहे अपघातास आमंत्रण,रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता!

0
 कंबालपेठा - मदाराम रोड देतो आहे अपघातास आमंत्रण,रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता!



वैनगंगा वार्ता / क्रिष्णा गावडे (तालुका प्रतिनिधी)


सिरोंचा:-
 तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सिरोंचा आलापल्ली महामार्गाला जोडणारा कंबालपेठा ते मदाराम रस्ता अपघातास आमंत्रण देत आहे खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा असे चित्र दिसत आहे 
 दुचाकी आणि चारचाकी वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे वाहण कसे चालवावे हे कठीण होवून बसले आहे. रस्त्यावर इतके खड्डे झाले आहेत की, प्रत्येक जण या खड्यातून वाचण्यासाठी वळण लावून, कट मारून वाहण चालवावे लागते आहे खड्यांमुळे अनेकांचे लहान सहान अपघात झाले आहेत. पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचले जाते यामुळे खोल खड्यांचा अंदाज येत नसल्याने येथे अपघात घडण्याची मोठी दाट शक्यता आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी शासन एखादा मोठा अपघात होण्याची वाट बघत आहे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे याबाबीकडे लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.



परिसरातील या रस्त्याचे काम तीन वर्षांपूर्वी करण्यात आले आहे मात्र खड्डे पडलेले आहे. कंबालपेठा मदाराम रस्ता अजूनही दुर्लक्षित आहे. रस्ता जागोजागी फुटलेला असून

रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. त्याकारणाने वाहन चालकांना बराच त्रासांना सामोरे जावे लागत आहे. तरी, बांधकाम विभागाने या मार्गाची त्वरित दुरूस्ती करावी.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !