फोर व्हीलर वाहन गेले पुरात वाहून मात्र वाचले ग्रामसेवकाचे प्राण

0
फोर व्हीलर वाहन गेले पुरात वाहून मात्र वाचले ग्रामसेवकाचे प्राण


मुलचेरा:-
बुधवार, २३ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, मुलचेरा आणि इतर तालुक्यांमध्ये नाले दुथडी भरून वाहत होते आणि सखल भागातील पूल पाण्याखाली गेले होते.
मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथील  ग्रामसेवक उमेश धोडरे  वय ४५ वर्षं हे बुधवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांच्या चारचाकी वाहनातून नदी ओलांडत असताना कोलपल्ली नाल्याच्या अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात अडकले.
जोरदार प्रवाहात त्याचे वाहन वाहून गेले, परंतु धोडरे झाडाला चिकटून स्वतःला वाचवण्यात यशस्वी झाले.
घटनेची माहिती मिळताच, महसूल विभाग, पोलिस विभाग आणि स्थानिक बचाव पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि काळजीपूर्वक आणि समन्वित कारवाई करून धोडरे यांना यशस्वीरित्या वाचवले 
 आणि नंतर प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी रुग्णवाहिकेद्वारे घरी पाठवण्यात आले.
जिल्हा प्रशासनाने वेळीच कारवाई केल्याने मोठी दुर्घटना टळली.
मुसळधार पावसामुळे ओढे नाल्या मध्ये अचानक पूर येण्याची शक्यता असलेल्या भागात प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यंत पांडा यांनी जनतेला केले आहे.
पुलांवरून पाणी वाहत असताना वाहने पाण्यातून नेऊ नका असे आवाहनही त्यांनी लोकांना केले आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !