तीर्थक्षेत्र मार्कडा देव येथील मंदिराच्या जीर्णोद्धार काम गतीने पूर्ण करण्यासाठी परमपूज्य संत मुर्लीधर महाराज यांची 108 पराक्रमा यात्रा सुरु
परिक्रमेदरम्यान संत मुर्लीधर महाराजांची प्रकृती खालावली
भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी मुर्लीधर महाराजांची भेट घेत महाराजांच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास प्रशासनाची जबाबदारी राहील असा दिला निर्वाणीचा इशारा
चामोर्शी:-
विदर्भाची काशी अशी ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र मार्कडा देव येथील पुरातन मंदिराच्या जीर्णद्धाराच्या कामाची गती अतिशय संथ असुन या कामाकरीता प्रशासनाकडून वेळकाढूपणा चे धोरण स्वीकारण्यात येत आहे.कामाकरीता आवश्यक तंत्रज्ञाची संख्या कमी असून हे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी परमपूज्य संत मुर्लीधर महाराज यांनी 108 परिक्रमा यज्ञ आंदोलनाची सूरवात 21 जुलैपासुन सुरु केली रोज 51 किलोमिटर असे 108 परिक्रमा चे 5400 किलोमिटर प्रवास पायी चालत पूर्ण करण्याचा त्यांनी दृढनिश्चय केला. परिक्रमेच्या तिसऱ्या दिवशी महाराजांच्या पायाला फोडे आले असुन त्यांची प्रकृती खालावली आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी 23 जुलै रोजी चंद्रपूर जिल्हयातील ऊसेगाव येथे महाराजांच्या पालखीत सहभागी होत दर्शन घेतले. व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांची प्रकृती कमालीची खालावली असुन मार्कडा देव येथील पुरातन मंदिराच्या जीर्णद्धाराच्या कामात प्रशासन दिरंगाई करत असुन कामाची गती अतिशय संथ आहे. ही भाविकांच्या डोळ्यात धूळफेक असून या कामाला गती यावी यासाठी संत मुर्लीधर महाराजांनी जी परिक्रमा यात्रा सुरु केली याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र आज तिसऱ्या दिवशी महाराजांची प्रकृती खालावल्याचे पाहून मन अतिशय व्यतीथ झाले असुन प्रशासनाला अजूनही जाग आली नाही.महाराजांनी मात्र ही परिक्रमा यात्रा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला असल्याने महाराजांच्या जिवाचे काही बरे वाईट होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्वरित जिल्हाधिकाऱ्यांनी जीर्णउद्धराच्या कामाला गती देण्यासाठी कुशल तंत्रज्ञाची संख्या वाढवावी व या कामाला गती द्यावी अन्यथा महाराजांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यास, व त्यांच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला

