Big braking :
पोलीस नक्षल चकमकीत 8 लाखांचा इनामी डिप्टी कमांडर व स्नायपर नक्षली "सोढी कन्ना" ठार
गडचिरोली दि. 07 : छतिसगढ राज्य बीजापूर जिल्ह्यातील
नेशनल पार्क परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 8 लाख रुपयांचा इनामी डिप्टी कमांडर व स्नायपर सोढी कन्ना ठार झाला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. चकमक संपल्यानंतर त्याचा मृतदेह व 303 रायफल घटनास्थळी आढळून आली.
पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी सांगितले की, नेशनल पार्क परिसरात माओवादी हालचालींची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर डीआरजी बीजापूर, डीआरजी दंतेवाडा, एसटीएफ, कोब्रा 202 व 210 आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकांनी 4 जुलैपासून सर्च ऑपरेशन सुरु केले. ऑपरेशनदरम्यान ठिकठिकाणी थांबून थांबून चकमक झाली.
चकमक संपल्यानंतर करण्यात आलेल्या सचिंगमध्ये सोढी कन्नाचा मृतदेह, 303 रायफल, एके-47 मॅगझीन, 59 जिवंत राऊंड, माओवादी वर्दी, स्फोटके, कोडेक्स वायर, डेटोनेटर, रेडिओ, नक्षली साहित्य व इतर दैनिक उपयोगाच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. ही कारवाई नक्षलविरोधी मोहिमेसाठी महत्त्वाचे यश मानले जात असून, सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरुच असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे