पेसा कायद्यानुसार ग्रामसभेच्या मंजुरीने रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाने जप्त केल्यामुळे ग्रामस्थांचे आमरण उपोषण
खासदार डॉ.नामदेव किरसान यांची भेट
गडचिरोली:-
घाटी ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथे घरकुलासाठी आवश्यक रेती ग्रामसभेच्या मंजुरीने वाहतूक करीत असतांना ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. या कारवाईच्या विरोधात ग्रामसभेच्या वतीने स्थानिकांनी आमरण उपोषण व सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल घेत गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी उपोषण स्थळी भेट देउन ग्रामस्थांशी संवाद साधला. पेसा ग्रामसभेच्या हक्कात शासन किंवा कोणतीही यंत्रणा हस्तक्षेप करू शकत नाही. आदिवासी भागात घरकुलासाठी रेती वापरणे हा मूलभूत अधिकार आहे. या बाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी सांगितले.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी कुरखेडा जिवन पाटील नाट, उपोषण करते सचिव वन हक्क समिती प्रकाश ठाकूर, उपसरपंच फाल्गुन कुर्वे, नितेश कवाडकर, फाल्गुन मेश्राम, दीपक भोयर, त्र्यंबक नाकाडे, प्रतिष्ठित नागरिक रूपचंद दखणे, मनोज लाडे, लक्ष्मण बावणे, प्रकाश डडमल, हरीभाऊ गहाणे, नत्थुजी दखणे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामवाशी उपस्थित होते.