बस थांबा परिसरातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य,बेशरम व धानरोवणी करुन नागरिकांनी केला निषेध

0
बस स्थानक परिसरातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य,बेशरम व धानरोवणी करुन नागरिकांनी केला निषेध

आष्टी :- चामोर्शी तालुक्यातील आमगाव महाल येथील बस स्थानक परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे रहदरिसाठी फार कसरत करावी लागते आहे. सदर रस्ता स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांसाठी अडचणीचा ठरत असून, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाला वेळोवेळी सूचना करूनही रस्त्याची दुरुस्ती केली नसल्यामुळे येथील नागरिक व विद्यार्थ्यानी चक्क रस्त्यावरच भातपीक व बेशरमच्या झाडाची रोवणी केली आहे.
स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षपणा व निष्काळजीपणामुळे गेल्या अनेक वर्षापासून बस स्थानक समोरील रस्त्यावर चिखल पसरलेला आहे सदर रस्त्याने मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते विद्यार्थी शाळेत ये - जा करतात तरीपण सदर रस्ता दुरुस्त झालेला नाही म्हणून आपल्या न्याय हक्कासाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १२ जुलै ते सकाळी १० वाजता रस्ता रोखून बेशरम व धान रोवणी करण्यात आली यावेळी सत्यवान पिपरे, साईनाथ बोदलकार,देविदास कोहळे, रोशन कुंघडकार,मनोहर दुधबडे,हरिदास दुधबडे,विजय गुरनुले,शाळेचे विद्यार्थी व बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते. येत्या आठ दिवसात रस्त्याचा विषय मार्गी न लावल्यास संबंधित कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !