करोडो रुपये बक्षीस असलेला नक्षलवाद्यांच्या मोठ्या नेत्याला सुरक्षा दलांनी पाठविले यमसदनी

0
 करोडो रुपये बक्षीस असलेला नक्षलवाद्यांच्या मोठ्या नेत्याला सुरक्षा दलांनी पाठविले यमसदनी 


नॅशनल पार्कच्या जंगलात नक्षल चकमक

गडचिरोली :- 
छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कच्या जंगलात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत नक्षल चळवळीतील अत्यंत मोठा नेता आणि केंद्रीय समितीचा सदस्य सिंहाचलम याला चकमकीत यमसदनी धाडले आहे 
  नक्षलवाद्याच्या मुसक्या आवळन्याचे राज्यभरात सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अखेर गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून जवळच असलेल्या भागात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ माओवादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने नक्षलविरोधी मोहीम सुरू केली तेव्हा इंद्रावती राष्ट्रीय उद्यानातील जंगलात गोळीबार सुरू झाला होता.


सिंहाचलम हा गेल्या 40 वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रीय होता. तो नक्षलवाद्यांच्या (Naxal) केंद्रीय समितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होता. विशेषतः नक्षल प्रचार आणि शिक्षण विभागाची जबाबदारी त्याच्याकडे होती. त्याच्यावर महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्रप्रदेश अशा 5 राज्यांत गंभीर गुन्हे दाखल होते. या राज्यांनी त्याच्यावर मिळून तब्बल ₹3 कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं.

छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कच्या जंगलात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत नक्षल चळवळीतील अत्यंत मोठा नेता आणि केंद्रीय समितीचा सदस्य सिंहाचलम याला चकमकीत ठार केलं. अखेर गडचिरोली सीमेपासून जवळच असलेल्या भागात ही मोठी कारवाई घडली

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !