वाघाने घेतला एका महिलेच्या नरडीचा घोट,आरमोरी तालुक्यातील घटना
देलोडा (बु):-
आरमोरी तालुक्यातील देलोडा (बु) टोली येथील एका महिलेच्या नरडीचा घोट घेऊन वाघाने ठार केल्याची घटना आज दि ०५/०६/२०२५ ला सकाळी घडली आहे
मृतक महिलेचे नाव मिराबाई कोवे वय ६० वर्षे रा.देलोडा (बु) टोली असे असून ती महिला जंगलात मोहाच्या टोळी संकलन करण्यासाठी सकाळी १० वाजताच्या सुमारास गेली होती टोळी संकलन करीत असताना वाघाने तीचेवर हल्ला करून ठार केले सदर महीला दुपारपर्यंत घरी परत न आल्याने शोध घेतला असता १.३० वाजताच्या सुमारास ती जंगलात मिळून आली तीला वाघाने ठार केल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली तेव्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे
मृतक महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे

