सहा लाख रुपयाचा सुगंधित तंबाखू (मजा) पोलीसांनी केला जप्त
राजूरा:-
राज्यभरात बंदी असतानाही सुगंधित तंबाखू खुलेआम विक्री करण्यात येत आहे मात्र याबाबतीत शासन उदासीन दिसून येते आहे
अश्यातच राजूरा पोलिसांनी ५ जून २०२५ रोजी सुगंधित तंबाखू व पानमसाल्याच्या बेकायदेशीर वाहतुकीवर मोठी धडक कारवाई केली. मुखबीराच्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी एक ॲटो थांबवून तपासणी केली असता तब्बल ५ लाख ९९ हजार ३२६ रुपयांचा बेकायदेशीर सुगंधीत तंबाखू व पानमसाल्याचा साठा मिळून आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. आरोपी अविनाश शेंडे वय ४२ रा. चंद्रपूर या व्यक्तीच्या ताब्यातील MH 34 D 6339 क्रमांकाच्या ॲटोमधून सदर अवैध माल जप्त करण्यात आला आहे त्यामुळे अवैध सुगंधित तंबाखू विक्री करणारांचे धाबे दणाणले आहेत

