स्वतंत्र विदर्भ राज्या करिता ७ जून ला भंडारा येथे विदर्भ राज्य निर्माण मेळावा

0
स्वतंत्र विदर्भ राज्या करिता ७ जून ला  भंडारा येथे विदर्भ राज्य निर्माण मेळावा 



गडचिरोली:-
 स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची मागणी १२० वर्ष जुनी असून विदर्भ राज्य निर्मितीकरिता नेमलेल्या वेगवेगळ्या आयोगाने विदर्भ राज्य निर्माण करण्याच्या शिफारशी करून सुद्धा विदर्भाच्या जनतेच्या विरुद्ध १ मे १९६० ला विदर्भाला महाराष्ट्रात सामील करून घेतलं विदर्भा करिता नागपूर करार करण्यात येऊन अनेक आश्वासने देण्यात आली त्यापैकी एकही आश्वासन शासनाने पूर्ण केले नाही. विदर्भ राज्याच्या आंदोलनात १८ विदर्भवादी शहीद झाले असून केंद्र सरकारच्या व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मागील वीस वर्षात ४७ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. विदर्भात सिंचनाचा, आरोग्य सुविधेचा, रस्त्याचा, शिक्षणाचा अनुशेष निर्माण झाला. या करिता सर्वच सरकार जबाबदार आहेत आहेत. नागपूर करारानुसार विदर्भातील युवकांना २३ टक्के नोकऱ्या देण्याचे करार करून फक्त ६ ते ७ टक्के नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विदर्भात बेरोजगार युवकांची फौज निर्माण होऊन रोजगारा करिता विदर्भातील युवक बाहेर जात आहेत. याचा परिणाम विदर्भातील चार आमदार व एक खासदार यांची संख्या कमी झाली. सर्वात जास्त वीज विदर्भात निर्माण होत असून विदर्भातच लोड शेडिंग ची समस्या आहे. गोसीखुर्द सारखे धरण ३८ वर्ष होऊन सुद्धा पूर्ण होऊ शकला नाही.विदर्भ राज्य आंदोलन समिती मागील १२-१३ वर्षांपासून सातत्याने विदर्भाचे स्वतंत्र विदर्भ राज्य होण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती सातत्याने वेगवेगळी आंदोलने करीत आहे. जनजागृती करत आहे. पूर्व विदर्भात जनजागृती करण्या करिता विदर्भ राज्य आंदोलन समितीने बालाजी लॉन, साई मंदिर च्या बाजूला, भंडारा येथे शनिवार दिनांक ७ जून २०२५ ला दुपारी १२ ते ५ वाजता या कालावधीत भंडारा,गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा पूर्व विदर्भाचा विदर्भ राज्य निर्माण मिळावा आयोजित केलेला आहे यात ( १) केंद्र सरकारने विदर्भाचे स्वतंत्र राज्य तात्काळ निर्माण करावे,(२) शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यात यावी, (३)अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करण्यात यावा, (४) बडनेरा - कारंजा- मंगरूळपीर - वाशिम व खामगाव - जालना या रेल्वे मार्गास केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा(५) कापूस सोयाबीन आणि भात या पिकांना शासनाने भावांतर द्यावे (६) मेळघाट विद्यापीठ सरकारने तात्काळ निर्माण करावे (७) सर्प दंशाने मृत्यू पडणाऱ्या व्यक्तीस इतर वन्यजीवा प्रमाणेच मदत देण्यात यावी, (८) शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरविण्यात यावी या व इतर मागण्यांचा समावेश आहे पूर्व विदर्भाच्या विदर्भ राज्य निर्माण मेळावा यात विदर्भवादी जनता, बेरोजगार युवक, कंत्राटी कर्मचारी, अन्यायग्रस्त शेतकरी बंधू आणि भगिनींनी सहकाऱ्यांसह सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा समन्वयक अरुण पाटील मुनघाटे, केंद्रीय समिती सदस्य राजकुमार शेंडे, डॉक्टर नीरज खोब्रागडे,विलास रापर्तीवार, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र सिंह ठाकुर, दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ पोरेड्डीवार, जिल्हा उपाध्यक्ष रमेश उप्पलवार, शालिक नाकाडे, घीसु पाटील खुणे, नसीर भाई जुम्मन, शहराध्यक्ष रमेश भुरसे, पांडुरंग नागापुरे, चंद्रकांत शिवणकार, पांडुरंग घोटेकर,मुत्ताजी दुर्गे, गोवर्धन चव्हाण, महिला आघाडीच्या अध्यक्ष अनिता मडावी, अर्शी शेख,युवा आघाडीचे ग्यानचंद सहारे, हेमंत मरकाम, गुरुदेव भोपये, वेणुदास वाघरे यांनी एका पत्रकातून केलेले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !