रस्त्यावर आलेल्या गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक झाडाला धडकला, चालकाचे मोडले दोन्ही पाय

0

रस्त्यावर आलेल्या गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक
झाडाला धडकला, चालकाचे मोडले दोन्ही पाय 



गडचिरोली : कोरची या तालुका स्थळापासून आठ
किलोमीटर अंतरावर मसेली मार्गावर शुक्रवारी सकाळी मोटारसायकल स्वार आणि अचानक रस्त्यावर आलेल्या गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक झाडाला धडकला. या अपघातात ट्रक चालकाचे दोन्ही पाय तुटले आहेत. संतोषकुमार साहु (४६, रा. रायपूर, छत्तीसगड) असे जखमी चालकाचे नाव आहे.
सीजी ०८-एझेड २६६० क्रमांकाचा ट्रक हैदराबाद इथून झारखंडकडे टॉवर उभारणीचे साहित्य घेऊन निघाला होता. मसेली मार्गावर मोटारसायकल स्वार आणि अचानक गाय आली. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक झाडाला आदळला. या अपघातात चालक संतोषकुमार साहु याचे दोन्ही पाय तुटले, तर वाहक नरेंद्र मदनलाल साहू (१८, रा. गिदवाहभवर, छत्तीसगड) हा किरकोळ जखमी झाला.घटनेची माहिती मिळताच कोरची ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश ठाकरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या साहाय्याने ट्रकमधून जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेद्वारे त्यांना कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. अनिकेत राऊत यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !