गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस च्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे घेतली प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे,सुरज चव्हाण व शिवाजीराव गर्जे यांची भेट

0
गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस च्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे घेतली प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे,सुरज चव्हाण व शिवाजीराव गर्जे यांची भेट



आष्टी:-
जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३० मे रोजी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा खासदार मा.सुनील तटकरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे पदेशाध्यक्ष सुरज चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची मुंबई येथील प्रदेश कार्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेउन जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसह प्रणय व्यंकटी बुर्ले अध्यक्ष गडचिरोली विधानसभा तथा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या गडचिरोली विधानसभा क्षेत्रामधील केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाट्नाकरिता व जाहीर सभेकरिता निवेदन देऊन वेळ व तारीख मागण्यात आली.
निवेदन स्वीकारल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गडचिरोली विधानसभा क्षेत्रामधील केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील प्रणय बुर्ले यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाट्नाकरिता व जाहीर सभेकरिता लवकरच वेळ व तारीख ठरवून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयास्तरावरून याची माहिती देऊ असे म्हणून होणाऱ्या कार्यक्रमाला येण्यासंदर्भात हिरवी झेंडी दिली.
त्यावेळी डॉ.सोनल कोवे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस गडचिरोली,पुष्पा व्यंकटी बुर्ले जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस गडचिरोली,व्येंकटेश बुर्ले समाजिक कार्यकर्ते,निशांत नैताम तालुकाध्यक्ष रा.कॉं.पा. तथा पाणीपुरवठा सभापती नं.प. चामोर्शी ,संतोष सोयाम जिल्हाध्यक्ष आदिवासी आघाडी सेल गडचिरोली, डॉ.नोमेश्वर जुवारे तालुकाध्यक्ष रा.काँ.पा. चामोर्शी, डॉ.हेमंत भाकरे पाटील जिल्हासंघठण सचिव रा.काँ.पा. गडचिरोली,अमोल कुळमेथे शहराध्यक्ष रा.काँ.पा.गड.,सागर जांपलवार तालुकाध्यक्ष रा.वि.काँ.चामोर्शी, पुरुषोत्तम खेडेकर तालुकाध्यक्ष सेवादल सेल रा.काँ.पा. चामोर्शी,बंडू मेश्राम तालुकाध्यक्ष आदिवासी आघाडी सेल रा.काँ.पा. चामोर्शी, लक्ष्मण तिमाडे तालुकाध्यक्ष ओ.बी.सी.सेल रा.काँ.पा चामोर्शी,राजेश दिवसे,काजल बुर्ले,तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !