टिव्ही पाहण्याचा मोह आवरला नाही म्हणून चौथ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
वैनगंगा वार्ता १९ :-
कोरची : तालुक्यातील बोडेना गावात गुरुवारला सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसराला हादरवून सोडले आहे चौथ्या वर्गात शिकणाऱ्या अवघ्या १० वर्षाच्या मुलीने मला टिव्ही बघू देत नाही म्हणत आत्महत्या केली सदर मुलीचे नाव सोनाली आनंद नरेटी असे आहे सदर घटना दिनांक २२ मे गुरूवारला सकाळी ८ च्या दरम्यान घडली. सोनाली हिने घरच्या मागील बाजूस असलेल्या पेरूच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला.
तिची मोठी बहीण संध्या (१२ वर्षे) हिच्यासोबत टीव्ही च्या रिमोट वरून वाद झाल्यानंतर रागाच्या भरात तिने हे टोकाचे पाऊस उचलले. माझं आवडत चॅनल पाहू दिल नाही. ही आत्महत्येची प्राथमिक कारणे समोर आली आहेत
सोनाली, संध्या व तिचा भाऊ सौरभ (८ वर्षे) हे तिघेही सघ्याच्या घडीला गोंदिया जिल्ह्यातील कोकना खोबा गावातील एका खासगी आश्रम शाळेत शिकत होते. उन्हाळी सुट्टी मुळे ते घरी आले होते. घरी आई मंगला आणि सर्वात लहान भाऊ शिवम राहात होते.
घटनेची माहिती मिळताच कोरची पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांनी घटना स्थळी भेट देत पंचनामा केला. मृतदेह कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून डॉ राहुल राऊत यांनी शवविच्छेदन केले.
या प्रकाराने बालकांच्या मानसिकतेविषयी पालकांना जागरूकतेची गरज भासणार आहे. समाजाने अशा दुर्दैवी घटना रोखण्यासाठी आपल्या मुलांशी योग्य प्रकारे संवाद साधला पाहिजे असे न केल्यास अशा परिणामांना सामोरे जावे लागते आहे