कोनसरी येथे नव लाख रुपये किंमतीची अवैध बिटी कापूस बियाणे पकडले कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी
सोबत होते आष्टी पोलीस
आष्टी (अशोक खंडारे):-
गुप्त माहीतीच्या आधारे २१/५/ २०२५ ला अनधीकृत बी टी (कापूस) बियाणे कोनसरी येथे येत असल्याचे खबर लागताच कृषी विभाग झाले व त्यांनी आष्टी पोलीसांच्या मदतीने नव लाख रुपये किंमतीचे बि टी बियाणे मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले
सदर कारवाई उपविभागीय कृषी अधिकारी धरेन्द गिर्हिपुंजे मोहीम अधिकारी आनंद पाल, तालुका कृषी अधिकारी चामोर्शी अमीत तुमडाम ,तंत्र अधिकारी चंद्रशेखर कोल्हे, विभागीय गुणनियंत्रक संदिप पवार, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी वैभव जाभुळे,मंडळ कृषी अधिकारी चामोर्शी पी पी गजभीये,कृषी पर्यवेक्षक चामोर्शी,यांचे सोबत आष्टी पोलीस निरीक्षक विशाल काळे पोलीस उपनिरीक्षक प्रतीक्षा वानवे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते
यावेळी येणारी पिके वाहण क्र एम एच ३४ बि झेड ४९५८ हीची तपासणी केली असता या वाहणात एक क्विंटल नव्वद किलो अवैध बिटी कापूस बियाणे आढळून आले सदर मालाची किंमत तिन लाख अंशी हजार रुपये व वाहनाची किंमत पाच लाख तीस हजार रुपये असे एकूण नऊ लाख दहा हजार रुपये असे मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे
सदर माल पकडून आष्टी पोलीस स्टेशन येथे अ.प .क्र११६/ २०२५ कलम ३१८ (४) भारतीय न्याय स़़हीता २०२३, सहकलम बियाणे नियंत्रण आदेश १९८३ खंड ३(१) ८( अ)सहकलम बियाणे बियाने नियम १९८६ चे नियम ७,८,९,१०,११,१२,१४,३८ सहकलम बियाणे कायदा १९६६ मधील खंड ७ व १९ महाराष्ट्र कापूस बियाणे ( पुरवठा वितरण व विक्रीचा किंमतीचे निच्छीतीकरन याचे विनियमण ) अधिनियम २००९ व नियम १० सहकलम अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९९५ मधील कलम १,२,३,व ७ सहकलम पर्यावरण स़रक्षण अधिनियम १९८६ चे कलम ७,८,१५(१),१५(२)सहकलम पर्यावरण स़रक्षण नियम १९८९ चे सहकलम २ (१(४,५व ७ (१( नुसार विनोद श्रीहरी वाढी वय ४२ रा बेंबाळ ता . मुल जिल्हा चंद्रपूर बियाणे उत्पादक यांचेवर कारवाई केली आहे