मरेगावच्या रणरागिणींनी दारुअड्डा उद्धवस्त करुन एक लाख रुपयाचा मुद्देमाल केला नष्ट
गडचिरोली:-
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी मोठ्या प्रमाणात मोहाची दारू गाळून विकली जात असून मरेगाव येथे दारूविक्री करणाऱ्यांविरोधात गावातील महिलांनी आठवडाभरापासून आक्रमक पवित्रा घेतला. ३१ डिसेंबर रोजी महिलांनी मोहफुलाचा सडवा व दारूचे प्लास्टिक कॅन जप्त करून सर्व मुद्देमाल नष्ट केला.
मरेगाव येथील मोहफुलाच्या दारूमुळे परिसराच्या आठ ते दहा गावातील महिलांना त्रास होत आहे.
आठ दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल
• पहिल्या दिवशी पाच दारू विक्रेत्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. दसऱ्या दिवशी दोघांना तर तिसऱ्या दिवशी एकाला पकडले. आतापर्यंत एकूण आठ दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महिलांनी आपल्यावर होणारा त्रास ओळखून महिलांनी पुढाकार घेऊन सुरुवातीला दारूविक्रीचा व्यवसाय बंद करण्याचे आवाहन केले. तरीसुद्धा दारूविक्रेते जुमानले नाहीत. अखेर २७ डिसेंबर रोजी महिलांनी धाड सत्र
कारवाईला सुरुवात केली शेतशिवारात एक लाख रुपयांवर मोहफुलाचा सडवा व दारू नष्ट केली. मरेगाव येथील दारूबंदी समितीच्या अध्यक्षा नंदा टेकाम, उपाध्यक्षा कुसुम सेलोटे, सचिव शीला खेवले, गोपिका निंबोड, विमल सेलोटे, पोलिस पाटील अण्णाजी कुलसंगे, तंमुस अध्यक्ष भक्तदास खेवले, धनराज खेवले, आदींनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला आहे.
या प्रकरणात अधिक तपास आरमोरीचे पोलिस निरीक्षक संजय मंडलिक यांच्या नेतृत्वात सुरू आहे.

