वाहन चालक संघटनेच्या आंदोलनास आमचा पाठिंबा - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
अरुण रामुजी भोले
नागभीड तालुका प्रतिनिधी
नागभीड- :
तळोधी येथे केंद्र सरकारने घेतलेले नवीन विधेयक नुसार अपघातातील वाहन चालक वाहन सोडून पळून गेल्यास वाहन चालकास ७ लाख रु. दंड व १० वर्षाची शिक्षा नवीन कायद्यात तरतूद केलेली आहे त्या संदर्भात हे कायदे रद्द करण्यात यावे यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना वाहन चालक संघटना तळोधी च्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी त्यांनी संघटना जे आंदोलन करीत आहे त्याच्या आम्ही पाठीशी आहेत असे आस्वाशीत केले
साधारण कुटुंबातील चालकाला १० लाख रू. दंड तसेच दहा वर्षाची शिक्षा परवडणारे नाही कारण की चालकांची महिन्यात कमाई जेमतेम घरखर्च , मुलाबाळांवरील खर्च व कुटुंब चालवितांना करावी लागणारी काटकसर हे करीत असताना त्यांचे जे हाल होतात ते शासनाने समजून तरी या कायद्यात दुरुस्ती करावी. या करीता वाहन चालक संघटना यांनी हे कामबंद आंदोलन सुरू केले आहे
वाहन चालक संघटनेचे निवेदन स्वीकारले तेव्हा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की ७० वर्ष काँग्रेसची सत्ता असताना असे कायदे आणले नाही, आज भाजप सरकारने हे कायदे आणले आहेत ते असे कायदे रद्द करण्यास आम्ही बीजेपी सरकारला धारेवर धरू आपल्या आंदोलनास गालबोट लागेल असे आपण कोनतेही अनुचित प्रकार करु नयेत व कायदा हातात घेऊ नये,असे त्यांनी पदाधिकाऱ्या सांगितले व हे वाहन चालकांनल लादलेले कायदे रद्द करण्यासाठी प्रयत्न करु कसे आश्वासीत केले.
यावेळी नागभीड तालुका कांग्रेस अध्यक्ष प्रमोदजी चौधरी, विधानसभा काँग्रेस संयोजक विनोद बोरकर, नागभीड कांग्रेस सचिव शरद सोनवाने, काँगेस कार्याध्यक्ष गणेश गड्डमवार, तळोधी युवक काँग्रेस अध्यक्ष वसीम छूकारिया, अमोल बावणकर, बाळू मदणकर, इरफान पठाण, इस्राएल शेख, होमदेव आत्राम, वेणूदास खोब्रागडे, रवी शेंडे, सुनील शेंडे, मधुकर गेडाम, व वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी तसेच बहुसंख्य वाहन चालक उपस्थित होते.

