येनापूर येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साहात साजरा

0
येनापूर येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साहात साजरा 


प्रमोद झरकर 

चामोर्शी:-
 येनापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एक जानेवारी ला 206 वा शौर्य दिन दिवस साजरा करण्यात आला. चौकातील मुख्य अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर प्रमुख अध्यक्ष यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सकार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर सामुहिकरित्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यात आली यावेळी सिद्धार्थ बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष जैसुक गेडाम,पंचशील बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष प्रमोद उमरे. तसेच प्रबुद्ध युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष अंकुश निमसरकार, मुकुंद गेडाम,लक्ष्मण बारसागडे,केशव गोंगले, सचिन दुधे,मारोती अवथरे,राकेश कुरखेडे, छत्रपती रामटेके, भीमराव रामटेके, सारिका गोंगले,शोभा कुरखेडे,दुमिंद्रा बारसागडे, वंदना रामटेके, योगिता रामटेके, कविता अलोणे, गोपिका गांधारे यांचेसह समाजाचे संपुर्ण पदाधिकारी व बौद्ध उपासक तथा उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजातील युवकांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !