सावित्रीमाईंनी ज्ञानाची ज्योत पेटवली- राधिका शिलेदार

0
सावित्रीमाईंनी ज्ञानाची ज्योत पेटवली- राधिका शिलेदार


डोंगरगाव (ता. मंगळवेढा ):-
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी खऱ्या अर्थाने ज्ञानाची ज्योत पेटवली, महात्मा फुले जरी दिव्याप्रमाणे असले तरी त्या दिव्याची वात सावित्रीमाईच होत्या असे प्रतिपादन जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा डोंगरगाव येथील ज्येष्ठ शिक्षिका राधिका शिलेदार यांनी केले.
यावेळी डोंगरगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या अर्धवेळ स्त्री परिचर श्रीदेवी साखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बुधवार दिनांक 03 जानेवारी 2024 रोजी डोंगरगाव शाळेत आयोजित केलेल्या बालिका दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता सातवीतील विद्यार्थीनी सई साखरे ह्या होत्या.
 कु.विरा तोडकर यांच्या हस्ते सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील, सहशिक्षिका प्रियांका घाटेराव, अंबिका कर्वे आदींची समयोचित भाषणे झाली.
यावेळी विविध गाणी,सवित्रीच्या ओव्या, प्रतिज्ञा, रांगोळी स्पर्धा, लिंबू चमचा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहा.शिक्षक आण्णासो मोहिते, अनिल पाटील यांच्यासह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. तर कविता वाघमारे मॅडम यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !