नागभीड नगरपरिषद क्षेत्रात तीव्र पाणी टंचाई.

0

नागभीड नगरपरिषद क्षेत्रात तीव्र पाणी टंचाई.


भाजप पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अभियंता यांना धरले धारेवर 

नागभीड नगर परिषदेने तेरा महिन्यात भरले 35 लाख रुपये बिल.

अरुण रामुजी भोले
नागभीड तालुका प्रतिनिधी

 नागभीड-:
नागभीड नगर परिषदेला पाणी पुरवठा करणारी तपाळ पाणी पुरवठा योजना ही 1999 ला सुरु करण्यात आलेली आहे.ही योजना प्रादेशिक पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद च्या माध्यमातून चालवण्यात येत आहे..सुरुवाती पासुनच ही योजना दोषपूर्ण राहिली आहे.. नागभीड सह दहा गावांचा समावेश या योजनेत आहे.. कधी तांत्रिक बिघाड, विज बिल भरणा न केल्याने,कधी पाईप लाईन फुटल्याने वर्षातील काही दिवस या योजनेच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला जातो.. आता तर चक्क बिल भरणा न केल्याने विद्युत विभागाने या योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने गेल्या दहा दिवसापासून पाणी पुरवठा बंद आहे.. त्यामुळे नागरिकांची ओरड सुरु असून लोक माजी लोकप्रतिनिधी न नगरपरिषदेच्या नावाने आरडा ओरड करीत आहेत.. मात्र नगर परिषद विभागाने गेल्या तेरा महिन्यात पाणीपट्टी स्वरूपात जमा झालेले 35 लाख रुपये जिल्हा परिषदेच्या या पाणी पुरवठा विभागाकडे भरणा केला आहे.. तीन महिन्या आधी या योजनेची 77 लाख रुपये थकबाकी होती.त्यापैकी पाणी पुरवठा प्रादेशिक विभागाने 9 लाख रुपये भरून विद्युत पुरवठा सुरु केला होता.. मात्र आता पुन्हा एकदा थकबाकी च्या नावावर विद्युत पुरवठा खंडित करून गेल्या 10 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिकांची ओरड झाल्याने नागभीड येथील भाजप पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद प्रादेशिक पाणी पुरवठा विभागाचे अभियंता नंदेश्वर यांना नागभीड येथे बोलावून नगर परिषद व पंचायत समिती येथे त्यांना वारवार बंद होणाऱ्या पाणी पुरवठ्या बद्दल धारेवर धरण्यात आले..तसेच एका दिवसात पाणी पुरवठा सुरु न केल्यास कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा मा.तहसीलदार नागभीड यांना निवेदनातून देण्यात आला.. यानंतर लगेच विद्युत विभागाने पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा सुरु केल्याची माहिती दिली.. तसेच परस्पर रित्या उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यालय भिकेश्वर येथे सुरु होते... भाजपा पदाधिकारी यांनी मागणी करून पंचायत समिती नागभीड येथे ते कार्यालय हलविण्यात आले व त्याचे उदघाटन संवर्ग विकास अधिकारी खोचरे मॅडम यांनी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे अभियंता करंजेकर व नंदेश्वर यांच्या उपस्थिती मध्ये केले... यावेळी विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर,माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार,माजी सरपंच जहांगीर कुरेशी,व्यापारी संघटना अध्यक्ष गुलजार धम्मानी, माजी नगरसेवक रुपेश गायकवाड,माजी नगरसेवक दशरथ उके,रामदासजी बहेकर,माजी नगरसेवक संजय अमृतकर,बंडू गेडाम,दिनेश समर्थ,पवन नागरे,रमाकांत ठाकरे,भूपेश चीलबुले,अमोल देशमुख,शुभम चिल्लुरे,राजू पिसे,विजय संदोकर,विजय बंडावार,मोजेश मरकाम व अन्य कार्यकर्ते तसेच पत्रकार घनश्याम नवघडे, राजेश झाल्लरवार,पराग गुंडेवार,पराग भानारकर,अरुण गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !