एसीबीच्या जाळ्यात अडकले वनपरिक्षेत्र अधिकारी, पाच लाख रुपये घेतांना रंगेहाथ अटक

0
एसीबीच्या जाळ्यात अडकले वनपरिक्षेत्र अधिकारी, पाच लाख रुपये घेतांना रंगेहाथ अटक 



आलापल्ली:-
  आलापल्ली वनविभागाअंतर्गत येत असलेल्या पेरमिली येथील लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला पाच लाख रुपयांची लाच घेताना गडचिरोली येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई दिनांक चार जानेवारीला गुरूवारी करण्यात आली.
प्रमोद आनंदराव जेनेकर वय 38 वर्ष वनपरिक्षेत्र अधिकारी वर्ग 2 पेरमिली ता. अहेरी असे लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यास मौजा तुमरगुंडा ते कासमपल्ली रस्त्याचे कामावरील पकडलेली ट्रॅक्टर सोडण्याकरिता व 72 लाख रुपये दंड कमी करून पाच लाख रुपये पर्यंत दंड करण्याकरता आरोपी प्रमोद आनंदराव जेनेकर वनपरिक्षेत्र अधिकारी पेरमिली यांनी दहा लाख रुपये लाचेची मागणी केली तक्रारदार यांना आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीच्या पोलीस उपाधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूरे यांचे पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत
गोपनीयरीत्या शहनिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता
त्यामध्ये पडताळणी दरम्यान प्रमोद आनंदराव जेनेकर वनपरिक्षेत्र
अधिकारी यांनी तक्रारदार यास तुमरगुंडा ते कासमपली रस्त्याचे कामावरील पकडलेली ट्रॅक्टर सोडण्याकरता 72 लाख रुपयाचा दंड कमी करून पाच लाख रुपये पर्यंत दंड करण्याकरता दहा लाख रुपये रकमेची मागणी पंचा समक्ष सुस्पष्ट मागणी केली व आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी  वाम व भ्रष्ट मार्गाने तडजोडी अंती पाच लाख रुपये लाच स्वीकारताना लाचलुतपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. तसेच पेरमिली येथे राहत असलेल्या शासकीय निवासस्थानाची घरझडती घेतली असता ८५ हजार रुपये रोख रक्कम मिळून आले असून ती जप्त करण्यात आली आहे. प्रमोद आनंदराव जेनेकर वनपरिक्षेत्र अधिकारी पेरमिली यांचे विरूद्ध उपपोलीस स्टेशन पेरमिली येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक  राहुल माकणीकर लाचलूचपत प्रतिबंधक विभाग नागपूर श्री सचिन कदम अप्पर पोलीस अधीक्षक लाचलूचपत प्रतिबंधक विभाग यांचे मार्गदर्शनात लाचलूचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीच्या पोलीस उप अधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापुरे गडचिरोली पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले सहायक फौजदार सुनील पेद्दीवार किशोर जौजारकर कर संदीप घोरमोडे संदीप उडान व चालक नरेश कस्तुरवार लाचलूचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केली.
नव्या वर्षातील ही पहिलीच कारवाई असून या घटनेने वनविभागात एकच खळबळ माजली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !