छोटे मासे जाळ्यात... पण सुगंधीत तंबाखूच्या काळ्या साम्राज्याचा 'मोठा मासा' अजूनही मोकाट

0

"छोटे मासे जाळ्यात... पण सुगंधीत तंबाखूच्या काळ्या साम्राज्याचा 'मोठा मासा' अजूनही मोकाट!"


मार्कंडा (कं) - अनखोड्यात कारवाई; प्रश्न मात्र कायम – पुरवठादार, घाऊक दलाल आणि तस्करांवर हात कधी?

आष्टी (अशोक खंडारे):-
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा (कं ) आणि अनखोडा येथे पोलिस, आरोग्य विभाग आणि मुक्तिपथच्या संयुक्त पथकाने तंबाखूविरोधी धडक कारवाई करीत किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई केली. कारवाई स्वागतार्ह असली तरी या कारवाईने एक मोठा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
रस्त्यावरील किरकोळ दुकानदारांवर धाड टाकून प्रशासनाने "छोटे मासे" पकडले; मात्र या दुकानांपर्यंत प्रतिबंधित तंबाखू, गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा माल पोहोचवणारे घाऊक पुरवठादार, काळाबाजार करणारे दलाल आणि संपूर्ण साखळी चालवणारे "मोठे मासे" अजूनही कायद्याच्या कचाट्यातून दूरच आहेत.
प्रतिबंधित माल गावागावात पोहोचतोच कसा? कोणत्या मार्गाने वाहतूक होते? कोणाच्या आशीर्वादाने हा काळा व्यवसाय फोफावतो? या प्रश्नांची उत्तरे शोधल्याशिवाय अशा कारवाया केवळ दिखाऊ ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
तंबाखूमुक्त समाजाचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून चालणार नाही. या अवैध साखळीचा सूत्रधार असलेल्या "मोठ्या माशांवर" कठोर कारवाई झाल्याशिवाय तंबाखू माफियाचे कंबरडे मोडणार नाही, अशी नागरिकांची तीव्र भावना आहे.

दोन दिवसांपूर्वी अनखोडा व मार्कंडा (कं) येथील आठ छोट्या व्यावसायिकांवर कारवाई करीत दोनशे रुपये असा दंड ठोठावला व कारवाई केली 
यापुढे मोठा व्यवसाईक पकडला जाईल काय की, त्यांचेकडून चिरीमीरीचा गोरखधंदा सुरू आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे 
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !