नागपूरात खैरे कुणबी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा ७ जानेवारीला

0

नागपूरात खैरे कुणबी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा ७ जानेवारीला 



नागपूर :-
 खैरे कुणबी समाज सुधारक संस्था, ग्रेट नाग रोड, जुनी शुक्रवारी द्वारा आयोजित उप वर-वधू परिचय मेळावा व स्नेहमीलन सोहळा येत्या रविवारी ७ जानेवारी रोजी सकाळी नागपुरात पार पडत आहे. १०.०० ते ३.३० या वेळेत नागपुरातील रेशीमबाग परिसरातील ग्रेट नाग रोडवर  हा मेळावा होणार आहे.
कार्यक्रमाचे उ‌द्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री
अशोक शिंदे राहणार आहे. तर मुख्य अतिथी म्हणून राजुरा विधानसभेचे आ. सुभाष धोटे, दक्षिण नागपूरचे आ. मोहन मते, गॉडवाणा विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे राहणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणुन ज्येष्ठ सप्तखंजिरीवादक व प्रबोधनकार भाऊसाहेब थुटे असतील. तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी
संस्थेच्या वेबसाईट व मोबाईल ॲपचे विमोचन, उपवर-वधू परिचय पुस्तिका सोयरिकालयचे प्रकाशन, दिनदर्शिका-२०२४ चे विमोचन तसेच उपवर-वधूच्या बायोडाटाचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करण्यात येणार आहे. विवाहपूर्व समुपदेशन होणार आहे. सोबतच समाजातील प्रतिष्ठित समाजबांधवव विविध जिल्ह्यातील संघटन टीमचे स्वागत होणार आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल मोंढे व सचिव प्रवीण चापले व संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !