केसकर्तनालयात सरपंचावर गोळ्या झाडून केली हत्या
तरणतारन :- (पंजाब)
केसकर्तनालयात बसलेल्या सरपंच यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे
सदर घटना ऐन मकर संक्रातीच्या एक दिवसापूर्वीच पंजाबच्या तरनतारण जिल्ह्यात १४ जानेवारी रविवारला सकाळी दोन वाजताचे सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी केली आहे.
चब्बल गावचे सरपंच अवन कुमार उर्फ सोनू चीमा हे एका केसकर्तनालयात आपले केस कापण्यासाठी नाव्ह्याजवळ बसले असतांना त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. लागलीच त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. कोणत्या कारणासाठी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली; याचा तपास सुरू असून लवकरच प्रकरणाचा उलगडा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

