घराशेजारीच असलेल्या शेतातून वाघाने पाडला एका महिलेचा फडशा
मुलचेरा तालुक्यातील कोडसापुर येथील घटना
मुलचेरा: -
तालुक्यातील कोडसापुर येथील रमाबाई शंकर मंजूमकर ही महिला आपल्या घराशेजारी असलेल्या शेतात कापूस वेचणी करीत असताना वाघाने हल्ला करून ठार केला असल्याची घटना काल दिनांक १५ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली
मिळालेल्या माहितीनुसार रमाबाई या आपल्या शेतात कापूस वेचणी करीत होत्या सांयकाळ होऊनही घरी परत न आल्याने मुलाने शेतात जाऊन पाहणी केली शेतात रमाबाई दिसून न आल्याने याची माहिती मुलाने गावकऱ्यांना दिली, गावकऱ्यांनी शेतात
गावाजवळील जंगलात शोध घेतले असता रात्री आठ वाजताच्या सुमारास गावाजवळील जंगलात रमाबाईचा मृत्तदेह आढळून आला असल्याची माहिती मिळाली आहे
अधिक तपास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे

