लाचखोर विज तंत्रज्ञ अडकला एसीबीच्या जाळ्यात

0
लाचखोर विज तंत्रज्ञ अडकला एसीबीच्या जाळ्यात






गडचिरोली-:
  विज कनेक्शन घेण्याकरिता सर्वे करून चार पोल बसत असताना ते कमी करून तिन पोल केल्याच्या कामाकरीता तक्रारदाराकडून दीड हजार रुपयांची लाच घेताना विज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ यांना गडचिरोली येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई दिनांक 14 जानेवारी रविवारला करण्यात आली.

महेंद्र डोमाजी बगडे, वय 36 वर्षे, पद वरीष्ठ तत्रज्ञ, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली असे लाचखोर आरोपीचे नाव आहे.

आरोपिने तक्रारदार यास मौजा सोनपुर शेत सर्वे नं.22 मधील

विज कनेक्शन घेण्याकरीता पोल सर्वे करून 4 पोल बसत असुन ते कमी करून 3 पोल केल्याचा कामाकरिता आरोपी नामे महेंद्र डोमाजी बगडे यांनी रुपये 5,000/- लाच रक्कमेची मागणी केली व आपले लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता वाम व भ्रष्ट मार्गाने तडजोडीअंती रुपये 1500/- लाच रक्कम स्वीकारतानां रंगे हाथ मिळून आल्याने नमुद आरोपीविरुद्ध पोस्टे. आरमोरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे नागपुर परिक्षेत्राचे मा. पोलीस अधीक्षक  राहुल माकणीकर, सचिन कदम, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र. वि. नागपूर, संजय पुरंदरे, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र. वि. नागपूर' यांच्या मार्गदर्शनात पर्यवेक्षक अधिकारी

श्रीमती अनामिका मिर्झापूरे, पोलिस उपअधीक्षक, ला.प्र. वि. गडचिरोली तपासी अधिकारी  राठोड, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. गडचिरोली शिवाजी राठोड, श्रीधर भोसले, पोलीस निरीक्षक, पोहवा. शकंर डांगे, पो.ना. किशोर जौंजारकर, पो.शि. संदीप घोरमोडे, संदीप उडाण, प्रविन जुमनाके चा.पो.ना. प्रफुल डोर्लीकर सर्व ला.प्र.वि. गडचिरोली. यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !