कर्जबाजारी शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक होते लाडवे
गडचिरोली :
स्थानिक कृषी उत्पन्न
बाजार समितीचे पोर्ला येथील संचालक मुकरू रावजी लाडवे वय (५५) यांनी सोमवारी दुपारी १ वाजता एका शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले असावे असे म्हटले जाते आहे
यावर्षी शेतीतूनही फारसे उत्पादन झाले नाही. त्यामुळे ते मागील काही दिवसांपासून मोठ्या चिंतेत होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
अजय चापले यांच्या शेतशिवारातील
विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही बाब पोलिसांना कळविण्यात आली तेव्हा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. लाडवे यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा आप्त परिवार आहे.

