व्यसनाधीनते पासून परावृत्त करण्यासाठी आष्टीत विशेष जनजागृती रॅली

0

व्यसनाधीनते पासून परावृत्त करण्यासाठी आष्टीत विशेष जनजागृती रॅली


आष्टी पोलीस स्टेशनचा उपक्रम 

अशोक खंडारे/ मुख्य संपादक

आष्टी:-
आजची तरुणाई पिढी दारु, इंटरनेट अशा विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जात असून त्यांना परावृत करण्यासाठी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष जनजागृती करण्यात येत असुन आज दिनांक ०१/०१/२०२४ रोजी सन २०२४ या नववर्षात पदार्पण करत असल्याच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दला अंतर्गत पोलीस स्टेशन आष्टी चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली "दारु नाही, दुध प्या" या संकल्पनेवर आधारीत व्यसनमुक्ती अभियान अंतर्गत व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

या रॅली मध्ये राजे धर्मराव हॉयस्कूल आष्टी, महात्मा ज्योतीबा फुले शाळा आष्टी तसेच श्री सदगुरु साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टी येथील विध्यार्थी व शिक्षकवृंद यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोदंविला. सदर रॅली आबेंडकर चौक, शिवाजी चौक, हनुमान मंदीर चौक ते पोलीस स्टेशन आष्टी येथे मार्गदर्शन सभा झाली सभेच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, प्रमुख अतिथी सरपंच बेबीताई बुरांडे, प्राचार्य दिपक रॉय उपस्थित होते याच वेळी व्यसनमुक्ती वर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली सदर स्पर्धेमध्ये तिन्ही शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला असून त्यांनी व्यसनमुक्ती वर आधारित चांगले मार्गदर्शन केले व त्यात प्रथम क्रमांक रोहित चटपालवार महात्मा ज्योतीबा फुले शाळा आष्टी, व्दितीय क्रमांक कल्याणी आत्राम तसेच तृतीय क्रमांक तनवी वागदरकर राजे धर्मराव स्कूल आष्टी यांनी मिळवल्याने त्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. त्यानंतर सदर कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहूणे यांनी तसेच अध्यक्ष श्री कुंदन गावडे सर यांनी विद्यार्थी यांना व्यसनमुक्तीवर मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या संकल्पनेनुसार सदर कार्यक्रमाची सांगता पोलीस स्टेशन आष्टी येथे कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व मान्यवरांनी दूध पिवून केली तसेच आंबेडकर चौक येथे "दारु नाही, दुध प्या" या संकल्पनेला अनुसरून जनतेला पोलीस स्टेशन आष्टी च्या वतीने दुध वाटप करण्यात आले.


सदर विशेष जनजागृती अभियान अंतर्गत व्यसनमुक्ती रॅली व वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रम गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधिक्षक निलोत्पल ,अप्पर पोलीस अधिक्षक (प्रशासन) कुमार चिंता , अप्पर पोलीस अधिक्षक (अभियान)यतीश देशमुख , अप्पर पोलीस अधिक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजीतकुमार जिमलगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !