श्री सद्गुरू साईबाबा महाविद्यालय हे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन शिकविणारे केंद्र बनलेले आहे :- शंकर पाटील मारशेट्टीवार
अशोक खंडारे/ मुख्य संपादक
आष्टी:-
श्री सद्गुरू साईबाबा महाविद्यालय हे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन शिकविणारे एकमेव केंद्र बनलेले आहे असे प्रतिपादन शंकर पाटील मारशेट्टीवार माजी पोलीस पाटील आष्टी यांनी केले . श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था अंतर्गत श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान वाणिज्य महाविद्यालय आष्टी येथे युवा स्फूर्ती 2023-24 वार्षिक स्नेहसंमेलन च्या बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमातून प्रमुख अतिथीच्या स्थानावरून ते बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ पी के सिंग, माजी उपसरपंच सौ नंदाताई डोर्लीकर ग्रामपंचायत आष्टी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ रमेश सोनटक्के, डॉ अपर्णा मारगोनवार , डॉ एम पी सिंग, डॉ प्रदीप, डॉ सोनाली ढवस, प्रा सचिन मुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते
युवा स्फूर्ती 2023 - 24 वार्षिक स्नेहसंमेलनात 29 व 30 डिसेंबर 2023 दोन दिवसीय कार्यक्रमात विविध प्रकारच्या सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये रांगोळी, डिश डेकोरेशन, फ्लावर सजावट, डान्स स्पर्धा, अंताक्षरी, फॅशन डिझाईन, फॅशन शो, डिबेट, गीत गायन स्पर्धा, आणि क्रीडा स्पर्धांचे जसे कबड्डी, हॉलीबॉल, बॅडमिंटन, चेस, कॅरम,आणि क्रिकेट या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये भाग घेऊन प्रथम पारितोषिक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि द्वितीय क्रमांक मिळविणाना शंकर पाटील मारशेर्ट्टीवार, सौ नंदाताई डोर्लीकर, डॉ पी के सिंग, डॉ रमेश सोनटक्के व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला महाविद्यालयाच्या वतीने डॉ पी के सिंग यांनी शंकर पाटील मारशेट्टीवार , संजय नानाजी पंदीलवार ,सौ नंदाताई डोरलीकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सौ नंदाताई डोर्लीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की युवा स्फूर्ती 2023- 24 वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी आपल्या मधे असलेले न्यूनगंड दूर करून सकारात्मक व सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोग करावा असे मौल्यवान मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय भाषणातून डॉ. पी के सिंग यांनी वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी असते त्याचा विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी वापर करावा असे सांगितले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अपर्णा मारगोनवार यांनी युवा स्फूर्ती 2023 आयोजनाची पार्श्वभूमी विशद केली सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरणाचे संचालन प्रा. महेश सिलमवार यांनी केले आभार प्रदर्शन डॉ रमेश सोनटक्के संयोजक युवा स्फूर्ती 2023 - 24 यांनी केले . वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रा सुबोध साखरे, प्रा महेश सिलमवार , प्रा जया रोकडे, प्रा राहुल आवारी, प्रा कवींद्र साखरे संदीप मानापुरे, रवींद्र झाडे, कु सविता गारघाटे, अविनाश जीवतोडे विजय खोब्रागडे ,कु शुभांगी डोंगरे, रमेश वागदरकर, श्रीमती पौर्णिमा गोहणे, रजत रोहनकर, प्रशिक डोंगरे , कांचमवार, कुकुडकर,उषाबाई माहूरपवार व मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते

