बाप-लेक मिळून गेले मासेमारी करण्यासाठी मात्र नियतीचा खेळ वेगळाच

0
 बाप-लेक मिळून गेले मासेमारी करण्यासाठी मात्र नियतीचा खेळ वेगळाच 


राखेचा ढिगारा कोसळला आणि दोघांनाही गमावावे लागले प्राण 


वरोरा - :
  बाप - लेक मिळून मासेमारी करण्यासाठी गेले असता राखेच्या ढिगाऱ्याखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे 
वरोरा जवळील नंदोरी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात काळ्या गिट्टीच्या खदानी आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरात शेकडो खोल खड्डे खोदून गौणखनिजाचे उत्खनन केल्या जात आहे. खड्डे खोदल्यानंतर शासनाचा महसूल वाचवण्यासाठी या गड्ड्यां मध्ये वरोरा येथील औष्णिक विद्युत केंद्रातून निघालेल्या राखीतून हे गड्डे बुजवण्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
याच खेड्यांमध्ये मुलांचा व वडिलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सोबत असलेल्या दोन मुलांनी गावात जाऊन घडलेली घटना सांगताच परिसरातील लोकांनी आरडाओरडा करत या खदानी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हे ठिकाण निर्जनस्थळी असून मदत न मिळाल्याने रामचंद्र जंगेल वय 60, व मुलगा योगेश जंगेल वय 27 यांचा दुर्दैवी अंत झाला. सदर मृतक बाहेरील राज्यातील असून यापूर्वी सुद्धा अशीच घटना झाली असल्याचे समजते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !