सर्व घटकांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा विरोधी पक्षांनी काळ्या फिती बांधून केला धिक्कार

0
सर्व घटकांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा विरोधी पक्षांनी काळ्या फिती बांधून केला धिक्कार 



नागपूर:-
संसदेत खासदारांचे ज्या पद्धतीने निलंबन करण्यात आले त्या विरोधात विधी मंडळाच्या पायऱ्यांवर काळ्या रिबीन लावून आंदोलन आज करण्यात आले.

नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी संसदेत खासदारांचे झालेले निलंबन, हिवाळी अधिवेशनात शेतकरी , मराठा समाज ,ओबीसी समाज जनतेच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्याने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळी रीबिन बांधून निषेध आंदोलन केले.

आमच्या सरकारने शेतकऱ्यांना कोरोनाकाळात तारले होते. मात्र, विद्यमान सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली.

संसदेत खासदारांचे निलंबन, हिवाळी अधिवेशनात शेतकरी , मराठा समाज ,ओबीसी समाज यांच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर दिले नाही. राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती भयावह आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी जारी केलेल्या सर्व योजना या फसव्या आहेत. हिवाळी अधिवेशनाकडे राज्यातील शेतकरी, सर्व सामन्याचे डोळे लागले होते, मात्र, या सरकारने सामान्य जनतेची , शेतकऱ्यांची घोर निराशा केली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !