मोबाईल मध्ये व्यस्त न राहता खेळाच्या माध्यमातून आपले आरोग्य सुदृढ ठेवा - ना.धर्मरावबाबा आत्राम

0
मोबाईल मध्ये व्यस्त न राहता खेळाच्या माध्यमातून आपले आरोग्य सुदृढ ठेवा - ना.धर्मरावबाबा आत्राम 


अशोक खंडारे/ मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
आष्टी :-
आज दि. २१ डिसेंबर ला अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते दिवस - रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन केले सह उद्घाटक रायुकाचे जिल्हा सरचिटणीस प्रणय बुर्ले, रायुकाचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा पुष्पा बुर्ले सह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते 

गडचिरोली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मरावबाबा आत्राम यांचा आज नियोजित दौरा होता परंतू या दौऱ्यात आष्टी हे ठिकाण निश्चित नसतांना देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रणय बुर्ले यांच्या आग्रहाखातर त्यांना मान देत आष्टी येथे येऊन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन केले



याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ना.धर्मराव बाबा यांनी युवकांना आव्हान केले की आपण मोबाईल मध्ये ऑनलाईन खेळ खेळण्यापेक्षा कबड्डी सारखे शारीरिक खेळ खेळून आपले आरोग्य सुदृढ ठेवले पाहिजे कारण आपले आरोग्य सुदृढ ठेवल्यास कुटुंबाला फार मोठी मदत होते तसेच यामाध्यमातून तुमच्या मनामध्ये एक वेगळा उत्साह निर्माण होऊन देशसेवेचे महान कार्य आपल्या हातून घडू शकतात असे मोलाचे मार्गदर्शन केले 

सदर उद्घाटन समारंभास आष्टीचे सामजिक कार्यकर्ते संतोष सोयाम, जिल्हासंघटन सचिव डॉ. हेमंत भाकरे,सागर जांपलवार,पुरुषोत्तम खेडेकर,बंडू मेश्राम व बहुसंख्य खेळाडू तसेच खेळप्रेमी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !