घटनाकाराचे जातियवाद्यांना नको चौकास नाव, म्हणून बौध्द बांधवांनी सोडले गाव !!
भारताच्या इतिहासातील महाराष्ट्र राज्यातील पहिलीच घटना
अशोक खंडारे / मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
भारतीय संविधान निर्मात्याचे गावातील गावठाण जमीनीवर नाव देण्यात येऊ नये म्हणून जातियवाद्यांनी विरोध केल्याने गावातील बौद्ध बांधवांनी गाव सोडून गेल्याचा भारताच्या इतिहासातील महाराष्ट्र राज्यातील पहिलीच घटना गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथे घडली आहे
नवरगाव (कुनघाडा ) येथील बौध्द बांधवांनी गेल्या दोन वर्षापासुन भारतीय घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे नामफलक आंबेडकर वार्डातील चौकात नव्हे त्याच्या बाजुला गावठाण जमीनीवर , दुर्गे यांच्या घरासमोर लावला होता. व ग्रामस्थांनी ग्रामसभेत तश्या प्रकारचे ग्रामसभेचा ठरावही पारीत केला होता आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना सुद्धा ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी पोलीस स्टेशन चामोर्शी व उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली यांना वारंवार तक्रार करून सदर नामफलक पोलीसाच्या ताफ्यानी व ग्रामपंचायत च्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी हटविला आहे. आज दि. २१ डिसेंबरला सदर प्रकार घडल्यामुळे नवरगाव गावातील संपूर्ण बौध्द बांधवानी आपल्या मुला बाळा सहीत नाव सोडून बैलबंडीने आपले जीवनावश्यक साहित्य घेऊन गाव सोडून जात आहेत ते कुठे जात आहेत हे अजुनही समजू शकते नाही. परंतु जातीयवाघ्याच्या जाचाला कंटाळून संविधान निर्मात्याच्या नावाला विरोध करण्याऱ्या ग्रामपंचायत कमिटीचा निषेध करून तसा फलक हातात घेऊन बौध्द बांधव गाव सोडून जात आहेत. सदर घटना हि महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे

