नातलगाच्या अंत्यविधीसाठी गेलेला तरूण जवळच असलेल्या आत्या व बहिणीला भेटून येत
असताना मृत्युने कवटाळले
असताना मृत्युने कवटाळले
मरेगावजवळ असलेल्या वळणावर दुचाकी घसरुन झाला अपघात घटना
गडचिरोली :-
नातलगाच्या अंत्यविधीसाठी चांभार्डा येथे आलेला व अंत्यविधीला विलंब असल्याने मरेगाव येथे बहीण व आत्याला भेटून परत चांभार्डाकडे निघालेल्या वळनावर दुचाकी घसरून तरूणावर काळाने घात केला ही घटना २३ डिसेंबर ला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली काल घडली
सरगम श्रावण कोटगले वय २२ रा.
नगरी ता. जि .गडचिरोली असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. सरगम हा शनिवारी आपल्या गावाहून चांभार्डा येथे मयतीच्या कार्यक्रमासाठी आला होता. लगतच्या मरेगाव येथे त्याची आत्या व बहीण असल्याने तो त्यांना भेटण्यासाठी मरेगाव येथे गेला. नातेवाईकांना भेटून परत चांभार्डाकडे जात असताना मरेगाव-वडधा मार्गावरील मरेगाव पासून दीड किमी अंतरावरील वळणावर दुचाकीवरील त्याचे नियंत्रण सुटले. दुचाकीसह तो रस्त्याच्या कडेला पडला. यात डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मयतीच्या ठिकाणी आलेल्या आप्तपरिवार व बहिण, आत्या तथा नगरी वासीयावर शोककळा पसरली आहे
नगरी गावात हळहळ व्यक्त होत आहे

