बहिणीची भेट ठरली, भावाला अखेरची

0
बहिणीची भेट ठरली, भावाला अखेरची


दुचाकीला अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी भावाने जगाचा निरोप 


अर्जुनी-मोरगावः -
आपल्या बहिणीला भेटून परत गावाकडे जाताना वाटेत अपघात होऊन भावाने जगाचा निरोप घेतला असल्याची घटना अर्जुनी 
तालुक्यातील बोंडगावदेवी ते चान्ना- बाक्टी दरम्यान पुलाजवळ १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता झालेल्या अपघात घडली आहे
गंभीर जखमी असलेले विश्वनाथ विठोबा काळे (४८) रा. मुंगली यांचा १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते मुर्झपार्टी येथे राहत असलेल्या आपल्या बहिणीकडे गेले होते तेथून परतताना हा अपघात झाला होता 

विश्वनाथ विठोबा काळे हे त्यांच्या बहिणीकडे मोटारसायकल क्रं (एम.एच.३५ जे ८३२५) ने कामानिमित्त गेले होते. तेथून आपल्या मुंगली या गावी परतत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले.

त्यांच्यावर नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात आत्माराम जयराम कापगते (५२) यांच्या तक्रारीवरून अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ) सहकलम १८४ मोटार वाहन कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार बेहारे करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !