घराचे बांधकाम करीत असताना जिवंत विजेच्या तारांचा स्पर्ष होताच युवकाचा मृत्यू
मारेगाव तालुक्यातील मंगरूळ येथील घटना
मारेगाव :-
घराचे बांधकाम करीत असताना लोखंडी सलाख उचलली व ती लागुनच असलेल्या जिवंत विद्यूत तारांना लागली त्यामुळे विजेचा धक्का लागून एका बांधकाम मिस्त्रीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना दिनांक 23 डिसेंबर 2023 रोज शनिवारला सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडली.
मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव प्रफुल विठ्ठल तिवाडे, 33, रा. मांगरूळ असे आहे.
सविस्तर वृत्त असे की, मारेगाव शहरातील वार्ड क्र.6 मध्ये एका घराचे बांधकाम सुरु होते. प्रफुल हा नेहमी प्रमाणे मारेगाव येथे मिस्त्री काम करण्यासाठी आला असून. सायंकाळी 5-30 दरम्यान काम करत असताना अचानक त्याचे हातातील लोखंडी रॉडचा जिवंत 11 केव्ही विद्युत ताराला स्पर्श होऊन प्रफुलला जोरदार करंट लागला. करंट लागुन तो खाली कोसळला. ही घटना जवळच्या नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व त्याला लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले पण येथील डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषीत केले या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रफुल हा रोज मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. सदर घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करीत आहेत प्रफुलच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा आप्तपरीवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे

