जीवे मारण्याच्या उद्देशाने प्रेयसीने प्रियकरावर कोयत्याने केला वार
पुणे: -
शहरातील वाकड येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वाकड मधील अटलांटा सोसायटी जवळ असलेल्या आर्या चायनीज सेंटर येथे एका प्रेयशीने आपल्या प्रियकरावर पुण्यात जीवानीशी मारुन टाकण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केला ही घटना सोमवारी दि. 13 रोजी दुपारी 3.00 वाजताच्या सुमारास घडली. संजय नारायण जाधव वय 45, रा. श्रीधरनगर, चिंचवड असे जखमी प्रियकराचे नाव आहे. त्यांनी हिंजवडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यांच्या प्रेयशी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

