दारूच्या आहारी गेलेल्या पतीला पत्नीने एवढी दारू का पीता म्हणून खडसावले , पतीने रागाच्या भरात केली आत्महत्या

0
दारूच्या आहारी गेलेल्या पतीला पत्नीने एवढी दारू का पीता म्हणून खडसावले , पतीने रागाच्या भरात केली आत्महत्या 




वर्धा : -
व्यसनाधीन व्यक्ती भावना अनावर झाल्यावर काय करेल याचा नेम नसतो, असे म्हटले जाते. समुद्रपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या रामनगर इथेही असे विपरीत घडले. रामनगर  येथे राहणाऱ्या संजय लक्ष्मण येलगुंडे याला दारूचे जबर व्यसन होते. घटनेच्या दिवशी तो पिलेला असल्याने पत्नीने त्यास हटकले. दारु का पित बसता, असे विचारले. त्यातून दोघात वाद विकोपाला गेला.

रागाच्या भरात संजयने घराच्या अंगणातील लाकडी बल्लीला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती शंकर धोटे यांनी समुद्रपुर पोलीसांना दिली. प्रभारी ठाणेदार सुनील दहिभाते यांनी घटनास्थळी पोहोचून      पंचनामा करून मृतकास शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या सुपुर्द करण्यात आले त्याने आत्महत्या का केली याचा तपास प्रभारी ठाणेदार सुनील दहिभाते करीत आहेत 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !