पहिले पाजली दारु मग केली बेदम मारहाण व फेकले गावालगतच्या घराजवळ

0
पहिले पाजली दारु मग केली बेदम मारहाण व फेकले गावालगतच्या घराजवळ



एकतर अंगात दारुची नशा व बेदम मारहाणीमुळे गेला त्याचा जीव

गोंदिया :-
वडिलाला दारू पाजली आणि आईच्या कानशिलात हाणली. मग त्याला जिवंत का ठेवायचा, असा विचार करणाऱ्या मुलाने मित्रांच्या मदतीने त्या तरुणाला बेदम मारहाण करून रस्त्यालगत फेकून दिले, परंतु दारूच्या नशेत रात्रभर पडून असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 13 नोव्हेंबरच्या रात्री घडली. रवींद्र उर्फ गुड्डु हिरामण कावरे वय (30) रा. वारकरीटोली (कोटा) असे मृताचे नाव आहे.


याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी आरोपी भास्कर उर्फ उमेश देवचंद कावळे (29) रा. शारदा चौक कुडवा गोंदिया याच्यावर भादंविच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वारकरीटोला कोटरा येथील मृतक रवींद्र उर्फ गुड्डु हिरामण कावरे (30) याचा मृतदेह मंगळवारी सकाळी गावाबाहेरील एका घराशेजारी आढळला होता, याची माहिती मृतक तरुणाचा कुटुंबीयांनी सालेकसा पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. दरम्यान पोलिसांना रवींद्रच्या खून प्रकरणातील आरोपींचा सुगावा लागला. त्यावरून त्यांनी आरोपीला ताब्यात घेवून चौकशी केली असता या प्रकरणाचा उलगडा झाला.



पोलिस तपासात रवींद्रने गावातीलच देवचंद कावळे या व्यक्तीला दारू पाजली होती. देवचंदच्या पत्नीने माझ्या नवऱ्याला दारू का पाजली, म्हणून रवींद्रला शिवीगाळ केली होती. यावेळी रागात आलेल्या रवींद्रने तिला गालावर थापड मारली. या गोष्टीचा राग ठेवून आरोपी भास्कर उर्फ उमेश देवचंद कावळे (29) रा. शारदा चौक कुडवा गोंदिया याने आपल्या काही मित्रांसोबत संध्याकाळी रवींद्रला मोटारसायकलने साखरीटोला येथे नेऊन एका बारमध्ये त्याला दारू पाजली. गावात रस्त्यावर त्याला मारहाण केली व गावातील शेवटच्या घराच्या बाजूला फेकून दिल्याची बाब पोलिस तपासात पुढे आली. आरोपी भास्कर उर्फ उमेश देवचंद कावळे हा वारकरीटोला येथील मूळचा असून, तो गोंदियाच्या कुडवा येथे स्थायिक झाला आहे. या खून प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असून त्याचा शोध सालेकसा पोलिस घेत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !