पतीला गुंगारा देत एका विवाहितेचा प्रियकरासोबत पळून जाण्याच्या बेत फसला

0
पतीला गुंगारा देत एका विवाहितेचा प्रियकरासोबत पळून जाण्याच्या बेत फसला


पतीने रंगेहाथ पकडून प्रियकरास धारदार शस्त्राने भोकसले 

यवतमाळ : प्रियकरासह पळून जाण्याच्या बेतात असलेल्या पत्नीस पतीने प्रियकरासह रंगेहाथ पकडले आणि प्रियकरास चोप देत धारदार चाकूने भोसकले. ही घटना सोमवारी येथील पंचशील नगरात घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. निखील अविनाश मेश्राम (25) रा. पंचशीलनगर तलावपेठ असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याचे यवतमाळ नजीकच्या बोरगाव धरण येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेशी सूत जुळले. निखील हा यवतमाळात एका कार वॉशिंग सेंटरवर काम करीत होता. विवाहितेच्या पतीला या संबंधाचा संशय आला. तो दोघांवरही पाळत ठेऊन होता. पतीपासून सुटका करून पळून जाण्याचा बेत प्रियकर- प्रेयसीने आखला. त्याप्रमाणे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पळून जाण्याचे निश्चित झाले.

प्लॅनप्रमाणे विवाहिता प्रियकरासोबत पळून जाण्याच्या तयारीत होती. याची कुणकुण विवाहितेच्या पतीस लागली. त्यामुळे पाळतीवर असलेल्या पतीने दोघांनाही पंचशील नगर परिसरात पकडले. तिथे पती आणि प्रियकराची झटापट झाली. यात चिडलेल्या पतीने निखीलवर चाकूने सपासप वार केले. निखीलच्या पोटात चाकूचे घाव लागले. यात तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी शहर पोलिसांनी कलम 307 भादंविनुसार गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली. ही कारवाई ठाणेदार सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात अंकुश फेंडर, प्रदीप नाईकवाडे, संतोष व्यास, किरण पघडण, सुनील पैठणे यांनी केली.


जखमी निखीलला येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. चाकूहल्ल्यात गंभीर जखमी निखील मेश्राम याच्यावर शस्त्रक्रियागृहात उपचार सुरू असताना दुसरीकडे अपघात कक्षातून मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याने निखील मेश्रामचा मृत्यू झाल्याचा अहवाल (डेथ मेमो) शहर पोलीस ठाण्यात पाठविला. यामुळे एकच गोंधळ उडाला. निखील मेश्राम जीवंत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे माहीत होताच पोलिसांकडे पाठविण्यात आलेला मृत्यू अहवाल खोटा असल्याचे सांगितले जात आहे 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !