वर्धा :-
जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथे 23 वर्षीय युवतीच्या घरातून तिला बाहेर बोलावून हत्या करण्यात आली आहे या थरारक घटनेने दहेगाव गोसावी येथे तणावाचे वातावरण असून ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याचे कारण अद्याप समोर आले नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असल्याची चर्चा गावकाऱ्यामध्ये आहे.
वर्ध्याच्या नालवाडी येथील दोन तरुण दहेगाव गोसावी येथे पोहचले सोबत असलेल्या दोन मुलींना घराच्या गेटजवळून युवतीला हाक द्यायला लावली ,रात्रीला युवती घराबाहेर अंगणात येताच मागावून आलेल्या युवकांनी चाकूने गळ्यावर वार केले जखमी युवतीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला आहे.
अंकिता सतीश बाईलबोडे असे मृत्यू झालेल्या 23 वर्षीय युवतीचे नाव आहे. चाकूने वार करून पळ काढणाऱ्या दोन युवकांसह सोबतच्या दोन मुलींना गावकऱ्यांनी पाठलाग करीत पकडले व पोलिसांच्या
ताब्यात देण्यात आले दहेगाव गोसावी या घटनेमुळे तणावाचे वातावरण आहे. दहेगाव येथील पोलीस स्टेशन परिसरात लोक एकत्र जमले होते. या थरारक घटनेमुळे गावकाऱ्यामधे चांगलाच रोष आहे. यापूर्वी वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे प्राध्यापिका जळीत प्रकरण घडले होते, राज्यभर खळबळ माजली होती. या घटनेमुळे देखील आता महिला सुरक्षेच्या बाबतीत प्रश्न निर्माण होत खळबळ निर्माण झाली आहे.

