गुरवळाच्या सरपंचा दर्शना भोपये पायउतार अविश्वास ठराव झाला पारित

0
गुरवळाच्या सरपंचा दर्शना भोपये पायउतार अविश्वास ठराव झाला पारित






गडचिरोली:-
 तालुक्यातील मौजा गुरवळा येथील सरपंच दर्शना धनराज भोपये यांचे विरोधात दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावावर तहसीलदारांनी बोलाविलेल्या सभेत आज सदर प्रस्ताव ६ विरुध्द १ असा पारीत झाला. यामुळे दर्शना भोपये यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत पॅनलने गुरवळा ग्रामपंचायतीवर आपली एकहाती सत्ता प्रस्थापित केल्यानंतर दर्शना धनराज भोपये या सरपंच झाल्या होत्या. मात्र त्यांना मिळालेल्या संधीचा उपयोग गावाच्या विकासासाठी न करता भाजप व काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या काही ठेकेदारांशी संगनमताने अनेक विकासकामांत आणि गावातील नागरिकांच्या समस्यांबाबत मनमानी कारभार चालविला होता. यामुळे गावात ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल प्रश्न उपस्थित होवू लागल्याने नाराज सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.

सदर अविश्वास प्रस्ताव दाखल होताच विकासकामांतील भ्रष्टाचार उघडकीस येईल या भितीपोटी ग्रामपंचायत सदस्यांवर कॉंग्रेस व भाजपच्या वरिष्ठ लोकप्रतिनिधी आणि नेत्यांकडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर सरपंचाने एका सदस्याच्या घरी जावून माझ्यावर अविश्वास प्रस्ताव पारित झाला तर मी आत्महत्या करेन आणि त्याची जबाबदारी तुमची राहील अशीही भावनिक धमकी दिली होती. मात्र प्रकाश बांबोळे, चंद्रकांत भोयर, विलास अडेंगवार जया मंकटवार, छाया बांबोळे, निशा आयतुलवार या सर्व सहाही ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने राहून सरपंच दर्शना धनराज भोपये यांचे विरोधात मतदान केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !