उमरी येथील शेतातील तनशीच्या ढिगात आढळले इसमाचे मृतदेह, शंकाकुशंकाना फुटले पेव
आष्टी:- (अशोक खंडारे) - गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन हद्दीतील उमरी गावात शेतात तनशीच्या ढिगात एका इसमाचे शव दि. २९ जानेवारीला दुपारच्या सुमारास आढळून आले.
उमरी येथील पोलीस पाटील इंद्रदास चक्कावार यांनी दिलेल्या माहितीनुसार उमरी येथील चंद्रशेखर रोहनकर शेतशिवारात तनशीच्या ढिगात एका इसमाचे प्रेत असल्याचे माहिती वरुन आष्टी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून जवळपास चार ते पाच दिवसांपासून असावा असा अंदाज आहे सदर इसमाची ओळख पटली असून तो उमरी येथील अप्पाराव कांबळे वय ४७ वर्षे आहे या व्यक्तीचा घातपात आहे की काय याचा तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस करीत आहेत

